आज अप्पा असते तर १००व्या वाढदिवसाचा केक कापल्यावर म्हणाले असते, ‘आज मी शतकाधिपति झालो!’
ते हयात असते तर आज त्यांनी वयाचे शतक पूर्ण करून १०१व्या वर्षात पदार्पण केले असते. लेखक, प्रकाशक, मुद्रक, समीक्षक, संशोधक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ना. वा. टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू दे. ना. टिळक यांचे पुत्र या पलीकडे त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ते नाहीत, तरी त्यांच्या स्मृती आहेत. त्या जागवल्या पाहिजेत. त्यांना उजाळा दिला पाहिजे.......